जेएनएन,पुणे: पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW)  शीतल तेजवानी हिला ताब्यात घेऊन तिच्या कोरेगाव पार्क येथील घराची झडती घेतली. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी दिली. दरम्यान या कारवाईमुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे पाय अधिक खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.तेजवानी यांची आर्थिक चौकशीमुळे अनेक आर्थिक गैरव्यवहार उघड होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

EOW कडून चौकशी
कोरेगाव प्रकरणी शितल तेजवानी यांची सुमारे  दीड तास चौकशी केली.दरम्यान झडती घेत डिजिटल उपकरणे, कागदपत्रे जप्त करण्यात आली.तेजवानीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तपास पथकाने सुमारे दीड तास बारकाईने तपास केला. या दरम्यान लॅपटॉप,मोबाईल फोन,युएसबी ड्राइव्ह,व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे गोळा करण्यात आले आहे.बँक स्टेटमेंट्सचे फायली यांसारखी महत्त्वाची सामग्री जप्त करण्यात आली असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Mundhwa Land Scam Case: दिग्विजय पाटीलची कसून चौकशी, पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार

हेही वाचा: Mundhwa Case: मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात शितल तेजवानीला अटक