जेएनएन, भंडारा: विदर्भासह राज्यात उष्णतेचा कडाका वाढत असताना पाण्याचं संकटही तीव्र होत चाललं आहे. तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा भंडारा जिल्ह्यात परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक उपनद्या आणि नाले कोरडे पडले आहेत.
भंडाऱ्यात नदीपात्र कोरडे
लाखनी तालुक्यातून वाहणारी चुलबंद नदी पूर्णपणे आटली आहे. एकेकाळी वर्षभर पाणी असणाऱ्या या नदीचं पात्र आता कोरड पडलेलं दिसत आहे.नदीतील पाणी आटल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचणी निर्माण झाले आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाले आहे. स्थानिकांच्या मते, यंदा पावसाचं प्रमाण कमी आणि वाढती उष्णता यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
जळगावमध्ये उष्णतेचा शेतीवर परिणाम
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे केळी पिकांना मोठा फटका बसत आहे.तापमान ४० अंशांच्या पुढे असल्याने केळीच्या पानांची जळजळ होत असून उत्पादनात घट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. केळी हे जळगावचं प्रमुख नगदी पीक असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
उष्णतेचा दुहेरी फटका
राज्यात सध्या दोन गंभीर समस्या एकत्र दिसत आहेत:
1. पाणीटंचाई – नद्या, तलाव आटत आहेत
2. उष्णतेची लाट – शेती आणि आरोग्यावर परिणाम होत आहे.
प्रशासनाची उपाययोजना
* टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याची शक्यता
* जलसंधारण आणि पाणी बचतीचे उपाय
* शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तयार करत आहे.
हेही वाचा: 'घरी जाऊन बायकोला काय सांगू?' म्हणत ग्राहकाच्या संतापाचा स्फोट; गॅस सिलिंडर न मिळाल्याने स्वतःचं डोकं फोडलं!
