जेएनएन, मुंबई: शिख समाजाचे नववे गुरु श्री तेगबहादूर सिंह साहिब जी यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त नागपुरातील नारा येथील कुकरेजा मैदान येथे येत्या 7 डिसेंबरला ‘हिंदी की चादर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद की चादर’ (Hind Ki Chadar) या भव्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी पार्किंगची प्रभावी व्यवस्था करण्यात आली असून वाहतूक सुरळीत व सुव्यवस्थित राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी आपापल्या जिल्ह्यानुसार खालील पार्किंग व्यवस्था नोंद घ्यावी. कृपया संबंधित नकाशे आपल्या मोबाईलमध्ये समाविष्ट करून सर्व ग्रुपमध्ये शेअर करावेत. अश्या सूचना मनपाच्या वतीने देण्यात आल्या आहे. बस पार्किंगच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आले असून अद्ययावत माहिती पुढीलप्रमाणे आहे :
बस पार्किंग व्यवस्था
कोराडी बस डेपो व कोराडी मंदिर परिसर याठिकाणी खालील मार्गांवरून येणाऱ्या बसेस पार्क होतील :
- तुमसर
- साकोली
- छिंदवाडा
- कामठी
खापरखेडा - नागपूर जिल्ह्यातील इतर भाग
- मध्य प्रदेशातील विविध जिल्हे
- वर्धा
- चंद्रपूर
मानकापूर स्टेडियम मैदान याठिकाणी खालील जिल्ह्यांतून येणाऱ्या बसेस :
- यवतमाळ
- अमरावती
- अकोला
- वाशीम
- बुलडाणा
इंदोरा ग्राउंड येथील व्यवस्था खालील जिल्ह्यांसाठी :
- मौदा
- भंडारा
- गोंदिया
- गडचिरोली
- कॅम्पटी रोड — लांबा सेलिब्रेशनसमोरची मोकळी जागा मिनी बसेस पार्किंग
शटल बस सेवा
वरील सर्व पार्किंग पॉईंट्सवरून *शटल बस सेवा* उपलब्ध असेल.
या बस भाविकांना *झुलेलाल स्पोर्ट्स ग्राउंड, जरपटका* येथे सोडतील.
दोन व चार चाकी पार्किंग
दोन चाकी व चार चाकी वाहनांचे पार्किंग :
*झुलेलाल स्पोर्ट्स ग्राउंड, जरीपटका*
शटल ई-रिक्शा सेवा
शहरातील विविध ठिकाणांहून ई-रिक्शा शटल सेवा उपलब्ध असेल. ही वाहने खालील उतराई पॉईंट्सवर थांबतील :
- नारा घाट टी पॉईंट
- खुशी नगर
- प्रजापती गौतमी बुद्ध विहार
- तिरुपती नगर
- आराधना कॉलनी
- शिवगिरी चौक
- शंभू नगर
- संकट मोचन हनुमान मंदिर
- नारा गाव
सूचना
* भाविकांनी आपल्या सोयीसाठी दिलेले मार्गदर्शक नकाशे डाउनलोड करून ठेवावेत.
* वाहतूक पोलीस व स्वयंसेवकांच्या सूचनांचे पालन करावे.
* कार्यक्रम परिसरात शिस्त व स्वच्छता राखावी.
भविकांच्या सुरक्षित, सुव्यवस्थित व आनंददायी उपस्थितीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे. असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.
