जेएनएन, नागपूर: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर 29 महानगरपालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीनुसार यंदा नागपूर महानगरपालिकेतील महापौर पद महिला–सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी कार्यकाळात नागपूरला महिला महापौर मिळणार हे स्पष्ट झाले असून, या पदावर कोण विराजमान होणार याबाबत शहरात उत्सुकता वाढली आहे.

आरक्षण जाहीर होताच नागपूरच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. महापौरपदासाठी शहरातील काही चर्चित महिला नगरसेविकांची नावे पुढे येत असून, त्यात शिवानी दाणी, अश्विनी जिचकार, विशाखा मोहोड, नीता ठाकरे, दिव्या धुरडे, मंगला विकरे आणि साधना बरडे यांचा समावेश आहे. पक्षीय संख्याबळ, अंतर्गत राजकीय समीकरणे आणि नेतृत्वाच्या अनुभवावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याने ही शर्यत रंगतदार ठरणार आहे.

नागपूर महानगरपालिकेला यापूर्वीही अनेक महिला महापौरांचे नेतृत्व लाभले आहे.

महानगरपालिका निवडणूक निकाल (एकूण जागा – 151):

  • भाजप – 102
  • काँग्रेस – 31
  • एमआयएम – 04
  • शिवसेना (शिंदे) – 02
  • शिवसेना (ठाकरे) – 02
  • राष्ट्रवादी (अजित पवार) – 01
  • मनसे – 00

नागपूरच्या महापौर पदासाठी दावेदार महिला नगरसेवकांबद्दल
संख्याबळाच्या जोरावर महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात असून, भाजपच्या महिला नगरसेविकांमध्ये स्पर्धा तीव्र आहे. सध्या शिवानी दाणी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘इन्व्हेस्टर अॅडव्हायजर’ म्हणून नियुक्ती केल्याने त्यांचे राजकीय वजन वाढल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा:BMC Mayor: कोण होणार मुंबईचा महापौर? BJP च्या 5 महिलांची नावे टॉपवर, वाचा कोण-कोण आहेत शर्यतीत

    त्याचप्रमाणे, सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अश्विनी जिचकार यांचा महापालिकेतील अनुभव त्यांच्या बाजूने महत्त्वाचा घटक ठरत आहे. ज्येष्ठ नगरसेविका नीता ठाकरे यांचे नावही दीर्घकाळापासून महापौरपदासाठी चर्चेत असून, त्यांच्या अनुभवाकडेही लक्ष दिले जात आहे. दक्षिण नागपूरमधून सलग चार वेळा निवडून आलेल्या दिव्या धुरडे यांच्याकडे संघटनात्मक नेतृत्वाचा अनुभव असून, त्या देखील सक्षम दावेदार मानल्या जात आहेत.

    महिला–सर्वसाधारण आरक्षणामुळे यंदाची महापौरपदाची लढत विशेष महत्त्वाची ठरणार असून, अंतिम उमेदवार कोण असेल याकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे.

    हेही वाचा: Pune Mayor: कोण होणार पुण्याची महापौर? पीएमसीच्या प्रमुखपदासाठी भाजपच्या ‘या’ महिला नगरसेवक आघाडीवर

    हेही वाचा: PCMC Mayor: पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण होणार? भाजपमधील 6 दिग्गज नगरसेवकांच्या नावांची जोरदार चर्चा

    महिला महापौरांचे नावकार्यकाळाची सुरुवातकार्यकाळाची समाप्ती
    कुंदाताई विजयकर5 फेब्रुवारी 19669 फेब्रुवारी 1997
    कल्पना पांडे29 एप्रिल 199927 मार्च 2000
    वसुंधरा मसुरकर28  मार्च 20006 मार्च 2001
    पुष्पा घोडे7 मार्च 20014 मार्च 2002
    माया इवनाटे15 जुलै 200723 डिसेंबर 2009
    अर्चना डेहनकर24  डिसेंबर 20094 मार्च 2012
    नंदा जिचकर5 मार्च 201722 नोव्हेंबर 2019