जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर रवाना होत असून, या दौऱ्यात ते विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. अपघातात प्राण गमावलेल्या पायलटच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रोहित पवार थेट त्यांच्या घरी जाणार असल्याची माहिती आहे.
अलीकडे घडलेल्या विमान अपघातमध्ये अजित पवार सहीत या पायलटचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रोहित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले होते. आता प्रत्यक्ष भेट घेऊन कुटुंबीयांना धीर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या भेटीदरम्यान ते कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे रोहित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान विविध राजकीय गाठीभेटी होण्याचीही शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ नेते, तसेच इतर पक्षांच्या काही नेत्यांशी त्यांची चर्चा होऊ शकते. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, निवडणुका, तसेच आगामी राजकीय रणनीती यावरही या भेटींमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा: Maharashtra Politics: ‘एवढ्या वेळा पायलट का बदलले?’ अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरीनं व्यक्त केली शंका
