जेएनएन, मुंबई: मुंबईत पुढील आठवडाभर पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.शहर भागासह पूर्व उपनगरात ५ टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आले आहे. जलबोगद्यांच्या स्वच्छता आणि देखभाल कामांसाठी ही कपात करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या निर्णयानुसार, येत्या 20 एप्रिलपासून पाणीपुरवठ्यात कपात लागू होणार आहे. जलबोगद्यांच्या (Water Tunnel) साफसफाई आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे काही भागांमध्ये पाण्याचा दाब कमी राहणार आहे.

कोणत्या भागांना फटका?

* दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसर

* लालबाग, परळ, वडाळा पर्यंतचा पट्टा

* पूर्व उपनगरातील कुर्ला ते मुलुंड दरम्यानचा परिसर या सर्व भागांमध्ये सुमारे ५ टक्के पाणीकपात होणार आहे.यामुळे नागरिकांना पाणी कमी दाबाने मिळण्याची शक्यता आहे.

    पाणीकपातीमागील कारण
    महापालिकेकडून जलबोगद्यांच्या स्वच्छता आणि देखभाल कामे नियमितपणे केली जातात. या बोगद्यांमधूनच शहरात मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ही कामे अत्यावश्यक असून, भविष्यातील मोठे बिघाड टाळण्यासाठी ही पाणीकपात केली जात आहे.

    किती दिवस परिणाम?
    माहितीनुसार अंदाजे आठवडाभर पाणीकपात लागू राहणार आहे.काही भागात वेळोवेळी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    नागरिकांसाठी सूचना
    पाण्याचा वापर जपून करण्याची सूचना प्रशासन कडून केली  आहे. शक्य असल्यास पाणी साठवून ठेवण्याचे सूचना केले आहे. गळती किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे सांगितले आहे.

    हेही वाचा: Water Crisis: तलावांच्या जिल्ह्यात पाण्याचं भीषण संकट; भंडाऱ्यात नदी कोरडी, जळगावमध्ये उष्णतेचा शेतीवर परिणाम