जेएनएन, मुंबई: देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो (Indigo) समोर मोठे संकट उभे राहिले आहे. गेल्या 3 दिवसांत तब्बल 1300 पेक्षा अधिक विमान उड्डाणे रद्द करावी लागली तर अनेक उड्डाणांना दीर्घ विलंबाचा सामना करावा लागला. अचानक निर्माण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती उद्भवल्याची माहिती उघड झाली आहे.
मुंबई–दिल्ली–बंगळूर मार्गांवर सर्वाधिक परिणाम
विमानसेवेची सर्वाधिक गर्दी असलेल्या मुंबई, दिल्ली,बंगळूर या विमानतळांवर इंडिगोच्या वेळापत्रकात मोठे बदल पाहायला मिळाले.दरम्यान इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत पाहायला मिळाली.विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा, विलंबित बोर्डिंग आणि ताटकळून थांबण्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाले. हैदराबाद, नवी दिल्ली, पुणे, कोलकाता, चेन्नई यांसह देशभरातील अनेक विमानतळांवर प्रवाशांना बोर्डिंगसाठी तासन् तास वाट पाहावी लागत होते.
प्रवाशांचा संताप
कोणतीच माहिती नाही, काय चाललंय?”विमान रद्द होत असल्याने अनेक प्रवासींनी संताप व्यक्त केला.
इंडिगोची प्रतिक्रिया
सेवा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती इंडिगो यांनी दिली आहे.
इंडिगोने जारी केलेल्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांची अचानक टंचाई निर्माण झाली असून उड्डाण सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर पथके नेमली आहेत.कर्मचारी पुनर्वाटप, तात्पुरती नियुक्ती, ओव्हरटाईम, तैनात पथके या माध्यमातून स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.इंडिगोने प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे .तिकीट परतावा, पर्यायी उड्डाण, तारखा बदल यांसाठी विशेष हेल्पलाइन कार्यान्वित करण्यात आली आहे.
हेही वाचा: DGCA च्या निर्देशानंतर, इंडिगोने रद्द केली दिवसभरातील उड्डाणे; मध्यरात्रीपर्यंत दिल्लीहून 190 देशांतर्गत उड्डाणे रद्द
डीजीसीएकडून चौकशी
विमान उड्डाण सेवा रद्दीकरणांचा परिणाम पाहता विमान वाहतूक नियामक संस्था डीजीसीए (DGCA) ने तत्काळ दखल घेतली आहे.इंडिगोकडून विस्तृत माहिती मागवण्यात आली आहे असून कर्मचारी व्यवस्थापन, उड्डाण नियोजन, सुरक्षा बाबी, राखीव पथकांची उपलब्धता यांची तपासणी केली जात आहे.
हेही वाचा: इंडिगोच्या संकटादरम्यान रेल्वेची सक्रियता, 37 गाड्यांमध्ये जोडले 116 अतिरिक्त कोच; विशेष गाड्याही चालवल्या
