जेएनएन, मुंबई.Happy Republic Day 2026 Wishes: देशभरात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला जातो. राजधानी नवी दिल्लीपासून ते गावागावापर्यंत तिरंगा अभिमानाने फडकवला जातो. या निमित्ताने संविधान, लोकशाही आणि राष्ट्रप्रेम यांचा जागर केला जातो. संविधानाने दिलेले अधिकार आणि त्यासोबत असलेली कर्तव्ये यांची जाणीव ठेवत नागरिकांनी कर्तव्याच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करत. स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधानिक मूल्यांवर देशाची लोकशाही उभी असून, ही मूल्ये अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी केला जातो.
प्रजासत्ताक दिनी विविध कार्यक्रमांतून शहीदांच्या बलिदानाला नमन केले जाते, तसेच संविधानकर्त्यांना अभिवादन करून, “संविधान हेच आपले बळ आणि लोकशाही हीच आपली ओळख” हा संदेश अनेक भाषणांतून आणि शुभेच्छांमधून दिला जातो. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना हे शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्यात देशभक्तीची भावना जागवू शकता.
- संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेवत
कर्तव्याच्या वाटेवर चालूया.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांना
जपत पुढे जाऊया.
77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- तिरंगा फडकू दे अभिमानाने,
भारताची ओळख जपूया सन्मानाने.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- संविधानाचा सन्मान राखत
लोकशाही अधिक मजबूत करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- विविधतेत एकता हीच भारताची शान,
या शानला नमन आज आणि सदैव.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- कर्तव्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेम
याच मार्गावरून घडेल उज्वल भारत.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- संविधान हेच आपले बळ,
लोकशाही हीच आपली ओळख.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
- शहीदांच्या बलिदानाला नमन,
संविधानकर्त्यांना अभिवादन.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- तिरंग्याच्या प्रत्येक रंगात
भारताचा आत्मा दडलेला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- देशाच्या प्रगतीसाठी
आपले योगदान देण्याची आज प्रतिज्ञा करूया.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- लोकशाहीचा उत्सव साजरा करूया,
राष्ट्रप्रेम मनामनात जागवूया.
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
- न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता—
याच मूल्यांवर उभा आहे भारत.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा: Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वज का फडकवतात पंतप्रधान का नाही? जाणून घ्या
हेही वाचा: Indian Flag Journey: भारतीय राष्ट्रध्वजाचा अद्भुत प्रवास; जाणून घ्या 1880 पासून 1947 पर्यंत तिरंग्यात कोणते झाले बदल?
