जेएनएन, मुंबई: मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा महालक्ष्मी देवीची ( Devi Mahalakshmi) विशेष पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. आज राज्यभरातील मंदिरांत आणि घरोघरी भक्त उत्साहात महालक्ष्मीची पूजा- अर्चना करतात. मार्गशीष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा (Mahalakshmi Puja) केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि ऐशवर्य येत असे म्हटले जाते. आजच्या या शुभ दिनी देवीला खास ‘खिरी’चा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.

खिरीचा नैवेद्य — समृद्धीचे प्रतीक
या दिवशी दाखवली जाणारी ‘खीर’ (Kheer) ही लक्ष्मीप्रती कृतज्ञता आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. दूध, साखर, तांदूळ आणि सुका मेवा यांचा समावेश असलेल्या या नैवेद्याची तयारी प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. अनेक ठिकाणी सामुदायिक खिरप्रसादाचेही आयोजन करण्यात आले.

जाणून घ्या तांदळाची खीर बनविण्याची सोपी पद्धती 

साहित्य

  • तांदूळ – ½ कप
    दूध – 1 लिटर
  • साखर – ¾ कप (तुमच्या चवीप्रमाणे कमी-जास्त करा)
  • तूप – 1 टेबलस्पून
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • बदाम – 6-7 (कापलेले)
  • काजू – 6-7 (तुकडे)
  • मनुका – 1 टेबलस्पून (ऐच्छिक)

कृती

  • तांदूळ स्वच्छ धुऊन 15–20 मिनिटे भिजत ठेवा. त्यामुळे खीर गुळगुळीत आणि छान घट्ट होते.
  • एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा. पूर्णपणे उकळी आल्यावर गॅस मंद करा.
  • भिजवलेले तांदूळ पाण्याचा निथळ काढून दूधात घाला.
  • खीर तळाला लागू नये म्हणून मधूनमधून हलवत राहा.
  • वेगळ्या छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू-बदाम हलकेसे गुलाबी होईपर्यंत परतून खिरीत घाला.
  • तांदूळ नीट शिजल्यावर साखर घालून चांगले मिश्रण करा.
  • शेवटी वेलची पूड घालून खीर सुंदर सुगंधी बनवा.
  • खीर छान घट्ट झाली की गॅस बंद करा.
  • थोडी थंड झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवा.

टिप्स

    अजून स्वादिष्ट खीर हवी असेल तर थोडे केशर उकळत्या दुधात घालू शकता.

    तांदूळ फार जास्त न घालता दूध जास्त ठेवल्यास खीर प्रसादीसारखी छान गोड-सरशी बनते.

    हेही वाचा: Annapurna Jayanti 2025 Katha: देवी पार्वतीला का घ्यावं लागलं अन्नपूर्णा देवीचं रूप, जाणून घ्या ही अद्भुत कथा