जेएनएन, मुंबई. Akshaya Tritiya Wishes: हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीया सण देशभरात मोठया आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी नागरिक एकमेकांना शुभेच्छा देतात. “या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धीची अखंड भरभराट होवो” अशा सकारात्मक संदेशांपासून ते “देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि प्रत्येक स्वप्न साकार होवो” अशा भावनिक शुभेच्छांपर्यंत विविध संदेश लोक एकमेकांपर्यंत पोहोचवत आहेत.

अक्षय्य तृतीया हा नवीन कार्याची सुरुवात, खरेदी आणि गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी, नवीन व्यवसायाची सुरुवात तसेच विविध धार्मिक विधी मोठ्या उत्साहात पार पडतात. यावर्षीही “तुमच्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो” तसेच “तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो” अशा शुभेच्छांमुळे सकारात्मकतेचा माहोल निर्माण झाला आहे.

कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवार एकमेकांना संदेश पाठवत सणाचा आनंद साजरा करतात तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना हे शुभेच्छा संदेश पाठवून आनंद द्विगुणित करू शकता.

या शुभ दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि समृद्धीची अखंड भरभराट होवो. अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!