जेएनएन, मुंबई: लोकप्रिय रिअॅलिटी शो  बिग बॉस मराठी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फायनलपूर्वीच बिग बॉसच्या घरात माजी विजेत्यांची धमाकेदार एन्ट्री झाल्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही मोठा सरप्राइज मिळाला आहे.

सीझन 1 ची विजेती मेघा धांडे आणि लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग यांनी घरात प्रवेश करत स्पर्धकांना विविध टास्क दिले. या टास्कदरम्यान स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. माजी स्पर्धकांच्या उपस्थितीमुळे घरातील वातावरण अधिक रंगतदार आणि उत्साहपूर्ण झाले.

तसेच, सीझन 2 चा विजेता शिव ठाकरे देखील घरात दाखल होणार असल्याने शोमध्ये आणखी रंगत येणार आहे. त्यांच्या एन्ट्रीमुळे स्पर्धकांना नवे आव्हान आणि प्रेरणा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, आता बिग बॉसच्या घरात केवळ ५ स्पर्धक शिल्लक असून दीपाली सय्यद, राकेश बापट, तन्वी कोलते, अनुश्री माने आणि विशाल कोटियान यांच्यात ट्रॉफीसाठीची लढत अधिकच चुरशीची झाली आहे. प्रत्येक स्पर्धक विजेतेपद मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी खेळताना दिसत आहे.

लवकरच होणाऱ्या ग्रँड फायनलमध्ये बिग बॉस मराठी सिझन 6 चा विजेता कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: अशोक खरात प्रकरण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी आणि संयमाने हाताळलं, अभिनेत्री प्राजक्ता माळीचं मत