जेएनएन, पुणे: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) मध्ये 2025 साली मोठी भरती जाहीर झाली आहे. बँकेकडून लिपिक पदांसाठी एकूण 434 जागा उपलब्ध असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 20 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ pdcc.bank.in  येथे भेट द्यावी.

भरतीचा तपशील
बँक: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank)
पदाचे नाव: लिपिक (Clerk)
एकूण पदे: 434
अर्ज पद्धत: ऑनलाईन
संकेतस्थळ: pdcc.bank.in
अर्ज सुरू: 1 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2025

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे किमान 50% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी पात्र आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवाशांसाठी ७० टक्के पदे राखीव, तर इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 30टक्के पदे ठेवण्यात आली आहेत.

वयोमर्यादा

किमान वय: 21 वर्षे
कमाल वय: 38 वर्षे
सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट लागू होईल.

निवड प्रक्रिया

    उमेदवारांची निवड दोन टप्प्यांद्वारे होईल –
    ऑनलाईन लेखी परीक्षा (Online Test)
    मुलाखत (Interview)
    ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

    अर्ज शुल्क
    या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही, म्हणजेच अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.