फ्रान्सची राजधानी पॅलेस मध्ये ऑलम्पिक आणि पॅरालिंपिक 2024 खेळांचे आयोजन केले जात आहे. 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान हे आयोजन चालणार आहे.
भारताने यापूर्वी अनेक पदके जिंकली आहेत ऑलम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.
दरम्यान भारताच्या तीन नेमबाजाने इतिहास रचला आहे मनू भाकर, सरबज्योत सिंग आणि स्वप्निल कुसाळे यांनी पदक पटकावले आहे.
हरियाणाच्या मनू भाकरने एकाच ऑलिंपिक मध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला असा इतिहास रचणारी ती एकमेव खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ओलंपिक 2024 मध्ये दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आणि त्यानंतर सरबज्योत सिंग दहा मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरे कांस्यपदक जिंकले.
मनुसह हरियाणातील एका छोट्या गावातील असलेल्या सरबज्योत सिंगने दहा मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.
पुण्यात जन्मलेल्या स्वप्निल कुसाळेने नुकतेच तिसरे कांस्य पदक जिंकून भारतासाठी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. नेमबाज स्वप्निलने पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन मध्ये कांस्यपदक जिंकले.
भारताने ऑलिंपिकच्या कोणत्याही एका आवृत्तीत एकाच खेळात तीन पदके जिंकण्याची पहिलीच वेळ आहे.
मनोरंजनाशी संबंधित अशा प्रत्येक अपडेट साठी वाचत रहा jagran.com