पॅरिस ओलंपिक मध्ये भारतीय हॉकी संघांनी यावेळी कांस्यपदक पटकावले आहे भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
यासोबतच भारताचा अनुभवी गोलकिपर पी.आर. श्रीजेशने हॉकी मधून निवृत्ती जाहीर केली आहे श्रीजेशने संघाने स्पेनचा दोन एक असा पराभव केला.
स्पेन विरुद्ध भारत सामना श्रीजेशने शानदार बचाव करत संघाला विजयापर्यंत नेले या सामन्यात विरोधी संघाला नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले.
नऊ पैकी एकही पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर होऊ दिला नाही यासाठी श्रीजेशची कितीही प्रशंसा करावी ती कमीच आहे.
श्रीजेशने 2021 मध्ये टोकिओ ऑलम्पिक मध्ये चमकदार कामगिरी केली आणि 41 वर्षानंतर संघाला हॉकीमध्ये पदक मिळवून दिले.
टोक्यो ऑलम्पिक मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा पराभव केला होता यानंतर सर्व भारतीयांनी आनंदाने उड्या मारल्या श्रीजेशचे डोळेही पाणावले होते.
श्रीजेश म्हणाला की, निरोप घेण्याची हीच योग्य वेळ आहे गोलकीपर म्हणाला की, संघाने चमकदार कामगिरी केली असून हा सामना माझ्यासाठी संस्मरणीय आहे.
श्रीजेशने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 335 सामने खेळले आहेत श्रीजेशच्या खात्यात दोन ऑलंपिक पदके आहेत, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुवर्णपदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक आहे.
श्रीजेशला भारतीय हॉकी संघाचा आधार म्हटले जाते यासोबतच त्याला अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारही देण्यात आले आहेत अशाच इतर बातम्यांसाठी वाचत रहा jagran.com