स्पोर्ट्स डेस्क, नवी दिल्ली. भारतीय संघाने धर्मशाला येथे अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना सात गडी राखून जिंकला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, रहमानुल्ला गुरबाजच्या (102) शतकानंतरही अफगाण संघ 194 धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाने हा सामना अवघ्या 22.5 षटकांत जिंकला.
पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला, परिणामी 25-25 षटकांचा डाव खेळला गेला. शुभमन गिलने (84) भारताच्या डावाचे नेतृत्व केले. रोहित शर्मा 16 धावांवर धावबाद झाला. सामन्यानंतर गिलने या धावबादबद्दल भाष्य केले आणि पदार्पण करणारे गुरनूर ब्रार व हर्ष दुबे यांचे कौतुक केले.
हा सामना टी20 सामन्यासारखंच
भारतीय कर्णधार गिल म्हणाला, "हा सामना काहीसा T20 सामन्यासारखा होता. मला वाटते की, ज्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी सामना आमच्या हातून काढून घेतला. रहमानुल्ला गुरबाजने शानदार फलंदाजी केली. ज्या पद्धतीने त्याने आपले शतक पूर्ण केले ते अप्रतिम होते. मला वाटते की, मधल्या आणि अखेरच्या षटकांमध्ये आम्ही ज्या पद्धतीने पुनरागमन केले ते विलक्षण होते."
गिल म्हणाला, "खरं सांगायचं तर, मला वाटतं की फलंदाजीसाठी ही एक उत्तम खेळपट्टी होती. सामना जसजसा पुढे सरकत होता, तसतसे आम्ही गोलंदाजी करत असतानाही फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीवर चांगली पकड मिळत होती. जेव्हा ते गोलंदाजी करत होते, तेव्हा चेंडू बॅटवर खूप चांगल्या प्रकारे येत होता."
रन आउटबद्दला गिल काय म्हणाला
धावबाद होण्याबद्दल बोलताना गिल म्हणाला, "रोहित शर्माने रिप्ले पाहिला होता. त्यामुळे तो म्हणाला की, 'नो इट्स ओके'... अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यातही तो धावबाद झाला होता." धावबाद झाल्यानंतर रोहित खूप नाराज दिसत होता. गिलकडे न पाहताच तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
पदार्पण करणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलताना गिल म्हणाले, "गुरनूर ब्रारने सुरुवातीला ज्या प्रकारे गोलंदाजी केली - त्याचा जबरदस्त वेग, चेंडू स्विंग करणे आणि सातत्याने योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे - ते अप्रतिम होते. हर्षनेही चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकात 16-17 धावा देऊनही, ज्या प्रकारे त्याने पुनरागमन केले, स्वतःवर विश्वास ठेवला आणि धावगती कायम ठेवत गोलंदाजी करत राहिला, ते खूप प्रभावी होते."
गिल म्हणाला, "माझ्या मते एकदिवसीय सामन्यांमध्ये मधली षटके खूप महत्त्वाची असतात. जर गोलंदाज गट म्हणून आम्ही मधल्या षटकांमध्ये दबाव कायम ठेवून संधी निर्माण केल्या, फलंदाजी करताना एकेरी धावांची अदलाबदल केली आणि जास्त गडी न गमावता 6-6.5 चा चांगला धावगतीचा दर राखला, तर अखेरच्या षटकांसाठी सामन्याची चांगली जुळणी होऊ शकते. संघाच्या बैठकांमध्ये, गोलंदाज गट म्हणून मधल्या षटकांमध्ये संधी कशा निर्माण करायच्या आणि फलंदाजी करताना जलद गतीने धावा कशा करायच्या, या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करतो."
रोहित शर्मा कसा रनआऊट झाला?
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीमची सुरूवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात 46 रनची पार्टनरशीप झाली, पण अफगाणिस्तानचा स्पिनर अल्लाह गझनफरच्या बॉलिंगवर रोहित रन आऊट झाला. गझनफरचा बॉल रोहित लेग साईडच्या दिशेने खेळला तेव्हा गझनफर नॉन स्ट्रायकर एन्डला गिलच्या इथं जाऊन थांबला, त्यामुळे गिलला रन काढण्यासाठी पुढं धावता आलं नाही. गिल गझनफरमुळे मध्येच अडकल्याचं लक्षात येताच रोहित पुन्हा मागे फिरला, पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. स्ट्राईक एन्डच्या दिशेने धावत असताना रोहित शर्मा रनआऊट झाला.
Rohit Sharma run out video 📷 pic.twitter.com/VufwfHm4Pd
— The King 👑 (@lordkings_x) June 13, 2026
हेही वाचा - IND vs AFG 1st ODI: रोहित शर्माने रचला नवा इतिहास; अमरनाथ यांचा विक्रम मोडत भारतासाठी केला अनोखा पराक्रम
