नवी दिल्ली. Wife Murder Husband : मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातून उघडकीस आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या वादातून पतीची हत्या आणि त्यानंतर आरोपी पत्नीच्या विचित्र वर्तनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपी पत्नी पतीच्या मृतदेहाजवळ नवीन कपडे घालून नटून थटून व साज  श्रृंगार करून गेली. त्यानंतर बिअर प्यायली आणि लग्नाच्या वरातीत नाचली. पत्नीचे बिअर पिताना आणि नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हे धक्कादायक प्रकरण थंडला पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नरेला गावातील आहे. केलास (25) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा जून २०२५ मध्ये विवाह झाला होता. कुटुंबाला आशा होती पती-पत्नीचे नवीन नाते घरात आनंद आणेल, परंतु येणारी सून इतके मोठे कांड करेल असा त्यांनी कधी विचारही केला नसेल.

घरी काकाच्या मुलाचे लग्न होते.

ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी घडली. त्याच दिवशी कुटुंबात काका थावर सिंग माल यांचा मुलगा बंटीचा विवाह होता आणि घरात लग्नाच्या वरातीची तयारी सुरू होती. दरम्यान, कैलासची मोठी बहीण लीला त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत आली. वारंवार हाक मारून आणि ब्लँकेट काढूनही कैलास उठला नाही तेव्हा तिने त्याच्या पायाला स्पर्श केला. त्याचे पाय थंड व जड झाले होते. घाबरून तिने कुटुंबातील सदस्यांना बोलावले, त्यानंतर कैलासचा मृत्यू झाल्याचे उघड झाले.

पत्नीने दोरीने गळा दाबून केला पतीचा खून -

तपासात असे दिसून आले की कैलासच्या पत्नीने त्याचा दोरीने गळा दाबून खून केला होता. हत्येनंतर आरोपी पत्नीने लग्नात आलेल्या नवीन कपाटात दोरी लपवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पत्नीला ताब्यात घेतले. झाबुआच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी पत्नी अल्पवयीन आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

    हत्या करून पतीच्या मृतदेहाजवळ मेकअप -

    या खून प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे हत्येनंतर आरोपी महिलेचे वर्तन. मिळालेल्या माहितीनुसार, घरात पतीचा मृतदेह पडलेला असतानाही, ती महिला तिथेच उभी राहिली आणि स्वतःचे कपडे बदलले. तिने साडी नेसण्यासाठी तिच्या भाचीचीही मदत घेतली. जेव्हा भाचीने कैलासला उठवण्यास सांगितले तेव्हा महिलेने नकार दिला आणि म्हटले की कैलासने स्वतः उठवण्यास नकार दिला होता आणि तो लग्नाच्या वरातीत सामील होणार नाही. यानंतर, आरोपी पत्नी घराबाहेरील मंडपात आली व बियर पिऊन नाचताना दिसली

     पत्नी लग्नात नाचनाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संताप आणि आक्रोश दिसून येत आहे. सध्या पोलीस सर्व पैलूंचा तपास करत आहेत. हे प्रकरण केवळ कौटुंबिक शोकांतिका नाही तर सोशल मीडियाच्या व्यसनाबद्दल आणि नातेसंबंधांमधील वाढत्या असंवेदनशीलतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते.