जेएनएन, नवी दिल्ली. Operation Tiger: राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी पाच ते 6 खासदार हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे या पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊत पत्रकार परिषदेत काय म्हणाले…
"सध्या तरी मला वाटते की सर्वजण एकत्र आहेत आणि पक्ष एकसंध आहे. आतापर्यंत तरी कोणत्याही अधिकृत राजीनाम्याबाबत किंवा पक्ष सोडण्याबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मात्र, तुमच्या माध्यमातून आम्हाला या परिस्थितीबाबत माहिती मिळत आहे. रविवारी, 15 तारखेला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली 'मातोश्री'वर आमच्या सर्व खासदारांची बैठक झाली आणि आम्ही सर्वजण तिथे उपस्थित होतो. चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी सांगितले की ते पक्षासोबत आणि उद्धवजींसोबत आहेत… त्यांनी अनेक शपथा घेतल्या" असं संजय राऊतांनी म्हटलं...
15-15 कोटी आधी घेतले. त्यानंतर खाजगी विमानाने नांदेड, पुण्यात खासदार पुण्यात आले. उद्या 11 वाजता पार्टीची बैठक आहे. पक्षाची एक बैठक आहे. त्यानंतर आम्ही अध्यक्षांची भेट घेणार आहोत, असं राऊत म्हणाले.
राजाभाऊ वाजे यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांनी आपण जात नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावावर हे लोक निवडूण आले आहेत. न्यायालयीन लढाई आम्ही चालू केली आहे. बंडखोर खासदारांना आम्ही सोडणार नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले. पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
#WATCH | Delhi | Amid speculations of a split in Shiv Sena UBT, party MP Sanjay Raut says, "I have information that Rs 15 crore each was delivered to the MPs, after which they boarded charter flights from three places, including Nanded and Pune. We have issued a whip for the… pic.twitter.com/s50XxiJV3E
— ANI (@ANI) June 17, 2026
कोणत्याही पक्षनेत्याने आम्हाला पक्ष सोडत असल्याचे सांगितलेले नाही
शिवसेना (UBT) मध्ये फूट पडण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले, "मी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना संविधान रक्षणाबाबत पत्र लिहिले आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षनेत्याने आम्हाला पक्ष सोडत असल्याचे सांगितलेले नाही."
