नवी दिल्ली: लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावरून मोठा गदारोळ झाला. संसद सदस्यांनी सभापतींच्या आसनावर कागदाचे तुकडे भिरकावले. या गोंधळामुळे सभापतींना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करावे लागले.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज लोकसभेत पुन्हा बोलत होते, त्यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे उद्धृत केले. सभापतींनी त्यांना अडवले आणि इतर खासदारांना बोलण्याची परवानगी दिली. तथापि, गोंधळामुळे अनेक वेळा व्यत्यय आला. दरम्यान, खासदारांनी फाटलेले कागद सभापतींच्या खुर्चीवर फेकले.
6 खासदारांचे निलंबन
कागद भिरकाल्याबद्दल सभापतींनी चमाला किरण रेड्डी, वेंकटरमण, गुरजीत औजला, माणिकम टागोर, राजा वॉरिंगा आणि हिबी एडन यांना संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी निलंबित केले. महत्त्वाचे म्हणजे, निलंबनानंतर खासदारांनी पुन्हा एकदा पेपरचे तुकडे सभापतींच्या खुर्चीकडे फेकले.
Budget session of Parliament | In connection with the uproar in Lok Sabha and the incident of papers being thrown towards the Chair, six Opposition MPs, including Hibi Eden, Amarinder Singh, Raja Warring, Manickam Tagore, Gurjeet Singh Aujla, and Kiran Kumar Reddy, have been… pic.twitter.com/n96fBaQtYk
— ANI (@ANI) February 3, 2026
किरेन रिजिजू यांची राहुल गांधींवर टीका-
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. रिजिजू म्हणाले की, राहुल गांधी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाशी संबंधित एका मासिकातील लेखाचा हवाला देत आहेत. रिजिजू यांनी राहुल गांधींवर सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप केला.
खुर्चीवर बसलेले कृष्णप्रसाद टेनेटी यांनी राहुल गांधींना बोलण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा राहुल यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देऊन आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधी म्हणाले की हा चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. रिजिजू यांनी आक्षेप घेत म्हटले की, "आम्ही येथे ऐकण्यासाठी आलो आहोत आणि तो विषय सोडून द्यावा.
