नाशिक. TCS BPO controversy: नाशिकमधील TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निदा खानभोवतीचे वाद गंभीर होत चालले आहेत. आधी धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या आरोपांनी गाजलेल्या या प्रकरणात आता बॉम्बस्फोटाशी कथित कनेक्शन समोर आल्याने तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

कोण आहे निदा खान?

* पुण्यात शिक्षण घेतलेली तरुणी

* नाशिकमधील TCS युनिटमध्ये पायथन डेव्हलपर / HR संबंधित भूमिकेत काम  

* कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना तिचं नाव गुन्हेगारी प्रकरणात समोर आलं

सुरुवात कशापासून झाली?

    नाशिकमधील TCS BPO युनिटमध्ये महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ, जबरदस्ती धर्मांतराचा दबाव प्रकरणात

    9 FIR दाखल. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र निदा खान फरार आहे.

    दिल्ली बॉम्बस्फोट कनेक्शनचा धक्कादायक दावा?

    * तपासात दिल्लीतील बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयितांशी संबंध असल्याचा संशय

    * एका “डॉ. शाहीन” नावाच्या संशयिताशी संपर्क तपासला जातोय  

    * इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार तपासले जात आहेत

    तपास कुठपर्यंत?

    * NIA, SIT (विशेष तपास पथक) चौकशी करत आहे

    * संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करत आहे. 

    * आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे स्कॅन केले जात आहे. 

    * कंपनीतील अनेक कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे.