एजन्सी, पुणे: लोणावळा हिल स्टेशनवर शनिवारी पहाटे एका मिनी ट्रकशी कारची टक्कर झाल्याची घटना घडली आहे. यात गोव्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कारची लायन्स पॉइंटजवळ ट्रकला धडक 

त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे ते पिकनिकसाठी आले होते. पोलिसांनी सांगितले की, ते सहलीला जाताना कारची हिल स्टेशनमधील लायन्स पॉइंटजवळ एका ट्रकला समोरासमोर धडक झाली. 

"शनिवारी पहाटे हा अपघात झाला. काही स्थानिकांना दोन पुरुष गंभीररित्या जखमी झालेले कारमध्ये अडकलेले आढळले,” असे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

दोघांचा मृत्यू

योगेश सुतार (21) आणि मयूर वेंगुर्लेकर (24) अशी मृतांची ओळख पटली आहे, दोघेही गोव्यातील म्हापसा येथील रहिवासी आहेत, असे त्यांनी सांगितले.

    ट्रक चालकालाही दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. 

    पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.