पुणे. Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर पहिला मोठा अपघात झाला आहे. मिसिंग लिंकच्या बोरघाट येथील पुणे लेनवरील केबल-स्टेड ब्रीजवर तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. मुंबई पुणे दृतगती महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. मात्र अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंकच्या पुणेकडील लेनवरील केबल ब्रिजवर हा अपघात झाला. अपघातग्रस्त तिन्ही गाड्या मुंबईहून पुण्याकडे चालली होती. फॉर्च्युनर गाडीच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला. गाडी अचानकपणे मिसिंग लिंक वरील केबल स्ट्रे पूला जवळ तिसऱ्या मार्गिकेवर थांबली. त्यामुळे मागून येणारी हुंदाई कंपनीची वेरना कार फॉर्च्युनर गाडीवर आदळली. या नंतर हुदाई कारने आणखी एका कारला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने आणि गाडीतील एअर बॅग्ज उघडल्याने जिवीत हानी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे एक फॉर्च्युनर कार जात होती. कार चालकाने अचानक ब्रेक दाबला. त्यावेळी मागून येणाऱ्या दोन कार या फॉच्युनरवर आदळल्या.
दरम्यान या अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. काही काळाने वाहतूक सुरळीत झाली.
