जेएनएन, पुणे: Maharashtra Natural Gas Limited (MNGL) ने 16 जून 2026 पासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात ₹1 प्रति किलो/एससीएम वाढ लागू केली आहे. ही दरवाढ आजपासून म्हणजेच 16 जून 2026 पासून लागू होणार आहे.
नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्याने निर्णय
दरवाढीनंतर पुणे शहर,पिंपरी-चिंचवड तसेच चाकण, तळेगाव आणि हिंजवडी परिसरातील सीएनजीचा किरकोळ विक्री दर 95.75 रुपये प्रतिकिलो इतका होणार आहे. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एमएनजीएलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
सीएनजीचा दर पोहोचला 94.75 प्रति किलोवर (Pune CNG Rate)
याआधी 28 मे 2026 रोजी सीएनजीच्या दरात ₹2.50 प्रति किलो वाढ करण्यात आली होती, ज्यामुळे दर ₹92.25 वरून ₹94.75 प्रति किलो झाला होता. आता त्यात एक रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तो 95.75 रुपये प्रतिकिलो इतका होणार आहे.
PNG चा दर किती? (Pune PNG Rate)
घरगुती पाइपद्वारे पुरविण्यात येणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) दरातही किरकोळ वाढ करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात याचा दर 50.65 रुपये प्रति एससीएम (SCM) होता. आता पीएनजीच्या दरात ₹1 प्रति किलो/एससीएम वाढ लागू केली आहे.
