जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा खूप तिव्र झाल्या आहेत. विशेषतः विदर्भात सुर्य आग ओकत आहे. या भागातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. वर्धा आणि अमरावती येथे सर्वाधिक (44.4) तापमानाची नोंद दिसून येत आहे.

या जिल्ह्यात तापमान पोहोचले 44 अंशांच्यावर

राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांत तापमान हे 44 अंशांच्यावर पोहोचले आहे. यामध्ये अकोला (44.1), अमरावती (44.4), गडचिरोली (44.0), नागपूर (44.0), वर्धा (44.4), वाशिम (44.0) जिल्ह्यांचा समावेश आहे. 

हिटवेवची कारण काय?

राज्यावर अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाल्यामुळे आकाश स्वच्छ असून सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडत आहे. त्यामुळे तापमान झपाट्याने वाढत आहे.   

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना!

    • दुपारी बाहेर जाणे टाळा
    • भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ घ्या
    • डोक्यावर टोपी/स्कार्फ वापरा
    • हलके, सुती कपडे परिधान करा
    • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन IMD ने केले आहे.

    विदर्भातील जिल्ह्यांचे तापमान

    शहरतापमान
    अमरावती44.1
    अमरावती44.4
    भंडारा42.0
    बुलडाणा41.2
    ब्रह्मपुरी43.0
    चंद्रपूर43.6
    गडचिरोली44.0
    गोंदिया42.9
    नागपूर44.0
    वर्धा44.4
    वाशिम44.0
    यवतमाळ42.8
    जळगाव42.3