जेएनएन, भंडारा. Boat Collapse in Bhandara: भंडारा तालुक्यातील करचखेडा येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला, तर इतर पाच जणांनी प्रसंगावधान राखत पोहत किनारा गाठून आपला जीव वाचवला.
दोन तरुणांचा बुडून अंत
वैनगंगा नदीतील करचखेडा बेटावर आंघोळीसाठी गेले होते. यावेळी सात तरुणांची नाव परतीच्या प्रवासात उलटली. यात दोन तरुणांचा बुडून अंत झाला तर पाच जण पोहून काठावर आले. कृष्णा जगन्नाथ बोकडे आणि पवन मुरली चौबे अशी मृत तरुणांची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोघांचा मृत्यू
करचखेडा (ता. भंडारा) येथील वैनगंगा नदीपात्रात रविवारी सायंकाळी सुमारे 6:30 वाजता सात तरुण नदीतील एका बेटावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. सायंकाळी अंघोळ आटोपून सर्वजण त्याच बोटीने परत येत असताना नदीच्या मध्यभागी अचानक बोट उलटली. या दुर्घटनेत पवन मुरली चौबे आणि कृष्णा जगन्नाथ बोकडे हे दोघे नदीच्या पाण्यात बुडाले.
पाच जणांनी वाचवला जीव
इतर पाच युवकांनी प्रसंगावधान राखत पोहत नदीकाठ गाठला आणि आपला जीव वाचविला. यामध्ये आकाश केवट, सुबोध ढोक, काशिनाथ मेश्राम, मृणाल मंदूरकर, अर्जुन मेश्राम या पाच जणांचा समावेश आहे.
