Mahaparinirvan Diwas 2025 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिवस. त्यांचे संपूर्ण आयुष्य प्रचंड संघर्षाचे राहिले. त्यांना महामानव का संबोधले जाते, हे सांगणाऱ्या त्यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी..
01 -प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यात तब्बल 32 पदव्या घेतल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.
02 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ –
कास्ट इन हिंदू 1916 (Caste in Hindu), प्रॉब्लेम ऑफ रुपी 1923 (The problem of Rupee), अनहिलीस्टेशन ऑफ कास्ट 1935, पूर्वीचे शुद्र कोण 1945 (Who were shudra), बुद्ध आणि त्यांचा धम्म 1957 'द अनटचेबल्स' यांसारख्या ग्रंथांचा समावेश आहे; त्यांची ग्रंथसंपदा खूप मोठी असून त्यात 32 पूर्ण आणि अपूर्ण ग्रंथ, प्रबंध, लेख आणि भाषणांचा समावेश आहे.
03 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे –
मूकनायक (1920), बहिष्कृत भारत (1927), समता (1928), जनता (1930), प्रबुद्ध भारत (1956, जनताचे नामांतर).
04 – डॉ. आंबेडकरांनी केलेले महत्वाचे सत्याग्रह व आंदोलने –
महाडचा चवदार तळे सत्याग्रह, (20 मार्च 1927), मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927), शेतकऱ्यांची चळवळ (1928), पर्वती मंदिर प्रवेश (1929), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (1931), पुणे करार (1932), येवला परिषद (1935), बौद्ध धर्मात प्रवेश (14 ऑक्टोबर 1956), बावीस प्रतिज्ञा.
05. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :
बहिष्कृत हितकारिणी सभा (1924), समता सैनिक दल (1927), स्वतंत्र मजूर पक्ष (1936), शेड्युल कास्ट फेडरेशन (1942), पीपल्स एज्युकेशन सोसायटी (1945), भारतीय बौद्ध महासभा (1955).
06. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा -
‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’
‘100 वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा’
07 बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान :
1955 मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, 1990 मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.
08 बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू-
चित्रकार - बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
पत्रकार- ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
राजकारणी - बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
अर्थतज्ज्ञ - ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
तत्वज्ञ - स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.
09 बाबासाहेबांच्या कार्याबद्दल काही अनटोल्ड गोष्टी –
दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोन नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली, असे म्हटले जाते.
10 - बाबासाहेबांचे लेखन –
भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण 22 ग्रंथ आणि पुस्तिका, 10 अपूर्ण राहिलेले ग्रंथ, 10 निवेदने किंवा साक्षीपुरावे, 10 शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.
