जेएनएन, मुंबई. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असल्याची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Press) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
लोकसभा अध्यक्षांकडे केली ही मागणी
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना (UBT) खासदार अनिल देसाई म्हणाले, "आम्ही लोकसभेच्या सभापतींना एक पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, जर एखादा गट त्यांच्याकडे आला, तर त्यांनी आम्हाला आधी त्याबद्दल कल्पना द्यावी. केवळ एखादा पक्षच दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतो; एखाद्या गटाचे कोणत्याही पक्षात विलीनीकरण होण्याबाबत कोणतीही तरतूद नाही."
#WATCH | Delhi | After meeting with Lok Sabha Speaker Om Birla, Shiv Sena UBT MP Anil Desai says, "We have given a letter to Lok Sabha Speaker stating that if any group comes to him, he should first let us know. Only a party can merge; there is no provision for a group to merge… pic.twitter.com/MHcXrCpcKK
— ANI (@ANI) June 17, 2026
6 खासदार फुटल्याच्या चर्चांना उधाण
संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील फुटीच्या चर्चावर त्यांनी माहिती नसल्याचे म्हटले. त्यांच्या या पत्रकार परिषदेला केवळ लोकसभेचे 3 खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर 6 खासदार फुटले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेचा व्हिप जारी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (यूबीटी) संभाव्य बंडाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, 'महत्त्वाच्या मुद्द्यांवर' चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याकरिता शिवसेनेने आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे. जे बैठकीला गैरहजर राहतील त्यांच्याविरुद्ध पक्ष अपात्रतेची कारवाई सुरू करू शकतो, असे त्यांनी म्हणाले आहे.
