जेएनएन, नवी दिल्ली. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी पत्रकार परिषदेला अवघे तीन खासदार उपस्थित होते.
संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील फुटीच्या चर्चावर त्यांनी माहिती नसल्याचे म्हटले. त्यांच्या या पत्रकार परिषदेला केवळ लोकसभेचे 3 खासदार उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर 6 खासदार फुटले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT 9 MP Name)
- अरविंद सावंत
- अनिल देसाई
- राजाभाऊ वाजे
- संजय दिना पाटील
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
पत्रकार परिषदेला उपस्थित खासदारांची नावे
- अरविंद सावंत
- अनिल देसाई
- राजाभाऊ वाजे
‘हे’ खासदार फुटले असल्याची चर्चा?
- संजय जाधव
- संजय देशमुख
- संजय दिना पाटील
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
