एजन्सी, मुंबई. Maharashtra Politics: उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (यूबीटी) संभाव्य बंडाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर, 'महत्त्वाच्या मुद्द्यांवर' चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याकरिता शिवसेनेने आपल्या खासदारांना व्हीप जारी केला आहे, असे सूत्रांनी बुधवारी सांगितले. जे बैठकीला गैरहजर राहतील त्यांच्याविरुद्ध पक्ष अपात्रतेची कारवाई सुरू करू शकतो, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, 2022 मध्ये जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 39 आमदारांनी शिवसेना नेतृत्वाविरुद्ध बंड केले होते, तेव्हाही पक्षाने असाच व्हीप जारी केला होता, ज्यानंतर त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई सुरू करण्यात आली होती.

विरोधी पक्ष शिवसेना (यूबीटी) संकटात सापडली असून, त्यांच्या नऊ लोकसभा खासदारांपैकी "सहा ते सात" खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत आणि ते दिल्लीत तळ ठोकून आहेत, असे सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

अरविंद सावंतांचे अध्यक्षांना पत्र

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभा गटनेते अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही कथित फुटीर गटाला किंवा विभक्त गटाला स्वतंत्र मान्यता, दर्जा, विशेषाधिकार देऊ नयेत, अशा आशयाचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना लिहून या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

    उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT 9 MP Name)

    1. अरविंद सावंत
    2. अनिल देसाई
    3. राजाभाऊ वाजे
    4. संजय दिना पाटील
    5. संजय जाधव
    6. संजय देशमुख
    7. नागेश पाटील आष्टीकर
    8. ओमराजे निंबाळकर
    9. भाऊसाहेब वाकचौरे

    कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा?

    1. संजय जाधव
    2. संजय देशमुख
    3. नागेश पाटील आष्टीकर
    4. ओमराजे निंबाळकर
    5. भाऊसाहेब वाकचौरे

    हेही वाचा - Operation Tiger: ‘त्या प्रत्येक खासदाराला 50 कोटी दिले’; महाराष्ट्रातील मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा