जेएनएन, मुंबई. Mumbai Weather Forecast: मुंबई आणि उपनगरांमध्ये आज 17 जून रोजी दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. IMD Mumbai ने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

मुंबईतील तापमानात वाढ (Mumbai Weather Forecast)

मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 36 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तापमान 36 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांना दिवसा उकाडा सहन करावा लागू शकतो.

पुढील पाच दिवस महत्वाचे

मुंबई शहर आणि उपनगरात पुढील चार दिवसांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसंच, उष्ण आणि दमट हवामानाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. 

मुंबई-कोकणात 25 जूननंतरच पाऊस? 

    हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत राहतील. मात्र व्यापक आणि मुसळधार पावसासाठी 25 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.याच कालावधीत बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात नवीन हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होऊन महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.