जेएनएन, मुंबई. Winter Session 2025: नागपूर मध्ये होणारे हिवाळी अधिवेशन आठवडाभरच चालणार आहे. आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत 8 ते 14 डिसेंबर असा अधिवेशनाचा कालावधी ठरविण्यात आला आहे.
पावसाळी अधिवेशात विधानसभा अध्यक्षांनी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 8 डिसेंबर पासून होणार असल्याची घोषणा विधानसभामध्ये केली होती. त्यानुसार, आज झालेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हिवाळी अधिवेशन (Winter Session 2025) आठवडाभरच!
एक आठवडाभरच हिवाळी अधिवेशन ठेवल्याने विरोधकांमध्ये नाराजीचा सुरु उमटताना दिसून येत आहे. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Winter Session 2025) हे नागपुरात 8 ते 14 डिसेंबर कालावधीत होणार आहे. यंदाचे अधिवेशन कालावधीने जरी कमी असले, तरी राजकीय तापमान वाढण्याची पूर्ण शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र चकमकी पाहायला मिळणार आहे. विदर्भातील हिताच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होणार असल्याची माहिती महायुतीकडून देण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा होणार!
- राज्यात सुरु असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये होत असलेल्या विविध प्रकारावर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
- राज्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने पॅकेजही जाहीर केले. मात्र, अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
- मागील काळात अनेक नेत्यांवर भष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. ते मुद्देही अधिवेशनात विरोधकांकडून उचलल्या जाऊ शकतात.
- हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषी संकट, ओला-दुष्काळ नुकसान भरपाई, वाढत्या महागाईचा फटका, तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न यावरून विरोधकांकडून सरकारला धडक देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - बीडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानादरम्यान हाणामारी, दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज
