मुंबई. निदा खान सध्या मुंबई मध्येच असून त्या सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांत निदा खान बेपत्ता असल्याच्या आणि देशाबाहेर गेल्याच्या विविध अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, कुटुंबीयांनी या सर्व बातम्या निराधार असून ती मुंबईतच वास्तव्यास आहे.
यासोबतच कुटुंबीयांनी एक महत्त्वाची माहितीही दिली आहे. निदा खान गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे निदा खान यांची वैद्यकीय देखरेखीखाली तपासणी सुरू आहेत. आरोग्याची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार निदा खानच्या कुटूंबाने खुलासा केला आहे की, ती टीसीएसमध्ये एचआर विभागात काम करत नव्हती, जसे सध्या टीव्ही चॅनेल व सोशल मीडियावर सांगितले जात आहे.
'सेल्स टीममध्ये काम करायची निदा खान'
कुटूंबीयांनी सांगितले की, तिचे पद टेली-कॉलरचे होते व ती सेल्स टीममध्ये काम करायची. ती डिसेंबर 2021 मध्ये बीपीओमध्ये रुजू झाली होती. तिचे पद वरिष्ठ अधिकाऱ्याचे नव्हते. कुटुंबाच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ती कधीही एचआर टीमचा हिस्सा नव्हती.
निदाच्या छोट्या भावाने काय सांगितले?
तिच्या छोट्या भावाने सांगितले की, सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर व्हायरल होत असलेला तिचा फोटो ज्यामध्ये तिला कंपनीच्या नाशिक यूनिटची एचआर हेड सांगितले गेले आहे, तो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून घेतला आहे. या फोटोवर हे पदनाम वेगळे जोडले गेले होते.
निदाच्या वडिलांना या गोष्टीचा पश्चाताप -
रिपोर्टनुसार, निदाच्या वडिलांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या मुलीचा अभिमान होता की, तिला एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली आहे. मात्र आता तिला कामासाठी प्रोत्साहन केल्याचा पश्चाताप होत आहे. तिचे वडील लाकडाचा व्यवसाय करतात. त्यांनी म्हटले की, तिने नोकरीच केली नसती तर बरे झाले असते. तिच्याविषयी इतक्या वाईट गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्यामध्ये काहीच सत्य नाही. यामुळे तिची आई आजारी पडली आहे.
पुढे त्यांनी म्हटले की, त्यांच्या मुलीने असे कोणतेच काम केलेले नाही. ती दररोज कामावर जायची व लोकांना 'हाय' आणि 'बाय' म्हटल्यामुळे संकटात सापडली.
'एमबीएचे शिक्षण घेत आहे निदा'
वृत्तानुसार निदा खानने कॉमर्समधून पदवी घेतली आहे व सध्या ती काम करत कॉरेस्पोंडेंसच्या माध्यमातून एमबीए करत आहे. निदाच्या काकाने सांगितले की, मागील वर्षी लग्नानंतर यावर्षी जानेवारी महिन्यात ती पतीसोबत मुंबईला शिफ्ट झाली. जेथे 9 एप्रिल पर्यंत सस्पेंड होऊपर्यंत कंपनीच्या मालाड बीपीओमध्ये काम करत होती.
दरम्यान, अफवांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाबाबत कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.अप्रमाणित माहिती पसरवू नये, असं आवाहन केलं आहे. अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असंही कुटूबियांनी दिली आहे.
