जेएनएन, मुंबई. राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरु आहे. ठाकरे गटाचे 9 पैकी पाच ते 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशा चर्चांना उधाण आले आहे. तसंच, अशीही माहिती आहे की, हे खासदार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत. यातच आता शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय संजय राऊत यांनी मोठा आरोप केला आहे.

संजय राऊतांचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी महुआ मोइत्रा यांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना असा दावा केला आहे की, फुटलेल्या खासदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिले आहेत.  

‘अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील  खासदारांना विकत घेण्यासाठी…आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा एडवांस देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे!’ असं म्हणतं खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. यावर खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊतांच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना महुआ मोइत्रा  म्हणाल्या की, ‘फक्त 15 कोटी रुपये? स्वस्तात का जात आहात? विश्वास ठेवा, आम्हाला 4 कोटी रुपये आगाऊ आणि पुढील 36 महिन्यांच्या मुदतीसाठी दरमहा 1 कोटी रुपये मिळाले आहेत..... मध आणि पैसा.’

महुआ मोइत्रा यांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी असा दावा केला की, ‘आपलं स्वप्न, पैसा, पैसा! नाही नाही — महुआजी, किमान आधारभूत किंमत प्रति खासदार 50 कोटी रुपये निश्चित केली आहे. (पचास खोके) 15 कोटी रुपये ही फक्त आगाऊ रक्कम आहे. खरं सांगायचं तर, हे लोक 50,000 रुपयांचे सुद्धा लायकीचे नाहीत. त्यांची किंमत फक्त शिवसेना आणि टीएमसीच्या ब्रँड लेबलमुळेच वाढली आहे.’

    उद्धव ठाकरेंच्या नऊ खासदारांची नावे (Shivsena UBT 9 MP Name)

    1. अरविंद सावंत
    2. अनिल देसाई
    3. राजाभाऊ वाजे
    4. संजय दिना पाटील
    5. संजय जाधव
    6. संजय देशमुख
    7. नागेश पाटील आष्टीकर
    8. ओमराजे निंबाळकर
    9. भाऊसाहेब वाकचौरे

    कोणते खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा?

    1. संजय जाधव
    2. संजय देशमुख
    3. नागेश पाटील आष्टीकर
    4. ओमराजे निंबाळकर
    5. भाऊसाहेब वाकचौरे

    हेही वाचा - Operation Tiger: ठाकरे गटाचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला? दिल्लीतून आली मोठी बातमी