जेएनएन, मुंबई. Jalna Municipal Corporation election 2026 result: जालना महानगरपालिकेची यंदा पहिल्यांना निवडणूक होत आहे. या  निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत 16 प्रभागांतील 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवारांनी रिंगणात उतरले आहेत. महापालिकेच्या या पहिल्याच निवडणुकीत दानवे कुटुंबासाठी आनंदाची बातमी आली आहे.

रावसाहेब दानवे यांचे बंधू विजयी

जालना महानगरपालिकेत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे विजयी झाले आहेत, अशी माहिती आहे. तसंच, भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे, यादेखील निवडून आल्या आहेत. या विजयासह दानवे कुटुंबाचे महापालिकेतील वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

राजकीय समिकरणे

जालना महानगरपालिकेत भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची युती तुटली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि मनसे यांची युती पाहायला मिळाली. 

शहरातील 291 मतदान केंद्रांवर गुरुवारी (15 जानेवारी 2026) शांततेत मतदान पार पडली. पहिल्याच महानगरपालिका निवडणुकीमुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.