जेएनएन, अमरावती: अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर पाच नराधमांनी लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मारहाण केली अन् तरुणीवर केला बलात्कार

अमरावती शहरालगतच्या भानखेडा फाट्याजवळील जंगल परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पाच नराधमांनी एका 18 वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या समवयस्क मित्राला रस्त्यात अडवले आणि त्या दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी तरुणाला बांधून ठेवत तरुणीवर पाशवी अत्याचार केला. 

पाचही नराधमांच्या मुसक्या आवळल्या

धक्कादायक बाब म्हणजे, या घृणास्पद कृत्याचा त्या नराधमांनी व्हिडीओही चित्रित केला. तसेच कुणाला या घटनेबद्दल वाच्यता केली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि ते तिथून पळून गेले. मात्र, अमरावती पोलिसांनी फिल्मी स्टाइलने चक्रे फिरवत अवघ्या 12 तासांत पाचही नराधमांच्या मुसक्या आवळल्या.  

पोलिसांची रात्रभर शोधमोहिम

    ही घटना 28 मार्च रोजी रात्री 8 वा. पीडिता मित्रासोबत मोपेडने परतत असताना घडली. त्यांना पाच जणांनी त्यांना अडवले. बळजबरीने जंगलात फरफटत नेत आरोपींनी पैशांसाठी तिच्या मित्राला मारहाण केली. पीडितेने तिच्याकडील 120 रुपये देऊनही एका नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी रात्रभर शोध मोहिम . तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रविवारी पहाटेपर्यंत सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.

    गुन्हा दाखल

    याप्रकरणी पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार व लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.