अमरावती. Amravati News: अमरावती जिल्ह्यात उघडकीस आलेल्या लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने चौकशीदरम्यान सांगितले की, पहिल्या ब्रेकअपनंतर तो 'प्लेबॉय' बनला होता.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, हे प्रकरण मानसिक आजारापेक्षा एका विशिष्ट मानसिकतेशी आणि जीवनशैलीशी अधिक संबंधित असल्याचे दिसते. अयान अहमद सोशल मीडियावर खूप सक्रिय होता आणि त्याची जीवनशैलीदेखील या प्रकरणात एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अयानचा मोबाईल फोनचा मोठा व्यवसाय होता आणि तो इंस्टाग्रामवरील पेड प्रमोशनच्या माध्यमातूनही चांगले उत्पन्न मिळवत असे. त्याचे सुमारे 18,000 फॉलोअर्स होते, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याचीे वर्चस्व होते.

सोशल मीडियाद्वारे करायचा संपर्क-

 मोठी कमाई असूनही तो तो मित्र आणि कुटुंबीयांकडून पैसे उधार घेत राहिला, आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो त्या पैशांचा वापर आपली आलिशान आणि ऐशोआरामी जीवनशैली कायम ठेवण्यासाठी करत होता.

अयान अहमद सोशल मीडियाद्वारे महिलांशी संपर्क साधायचा आणि हळूहळू त्यांच्याशी मैत्री करायचा. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो सुमारे चार ते पाच महिने घालवायचा, जेणेकरून त्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसेल. एकदा का विश्वास निर्माण झाला आहे असे त्याला वाटले की, तो कथितरित्या त्यांच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करायचा किंवा त्यासाठी दबाव टाकायचा.

    अयान एका राजकीय पक्षाशी होता संबंधित -

    पोलिसांच्या तपासात असेही उघड झाले आहे की, अयान अहमद एकेकाळी एआयएमआयएमच्या अमरावती युनिटचे सोशल मीडिया हँडल सांभाळत होता, परंतु नंतर त्याला पदावरून हटवण्यात आले.