मुंबई. Marathi Navvarsha 2026 Wishes: हिंदू नव वर्ष 2083 (Vikram Samvat 2083) की हार्दिक शुभकामनाएं। मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून होतो. गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक देदीप्यमान ठेवा आहे. हा दिवस केवळ कॅलेंडरमधील तारखेचा बदल नसून निसर्गातील नवचैतन्याचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव आहे. दारी उभारलेली उंच गुढी ही विजयाची पताका आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. ही गुढी जीवनातील संकटांवर मात करून यशाकडे वाटचाल करण्याचा संदेश देते. नवीन संकल्प, नवे विचार आणि जुन्या कटू स्मृतींचा त्याग करून सकारात्मकतेने आयुष्याची नवी सुरुवात करण्याचा हा मंगलमयी काळ प्रत्येक मराठी मनासाठी अभिमानाचा आणि उत्साहाचा असतो. यानिमित्ताने शेअर करा येथे दिलेले शुभेच्छा संदेश…

मराठी नववर्ष 2026 शुभेच्छा (Marathi Nav Varsh 2026 Wishes in Marathi)

1- ऋतूने बदलतं हिंदू वर्ष

नवं वर्ष येताच येते बहार

सगळीकडे दिसतो हा सुंदर बदल

असं असतं नववर्षाचं हे पर्व

    मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    2- सर्वांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करत 

    चैत्र शुक्ल प्रतिपदा व

    मराठी नववर्षाच्या शुभेच्छा 

    3- नवीन वर्षाची नवी पहाट

    सुख केवळ सुखच देवो

    मनातील सर्व अंधकार दूर होवो

    प्रत्येक क्षण प्रकाशाने भरून जावो

    मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    4- नवीन दिवे लागोत, नवीन फुले उमलोत.

    तुम्हाला रोज मातेचा आशीर्वाद मिळो.

    हे नववर्ष तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो.

    मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

    5- हे शुभ नवीन वर्ष तुमच्या जीवनात नवीन उत्साह आणि आनंद घेऊन येवो. विक्रम संवत 2083 तुम्हाला सुख आणि आनंद देवो!

    6- नक्षीदार काठीवर रेशमी वस्त्र

    त्याच्यावर चांदीचा तांब्या

    उभारुनी मराठी मनाची गुढी

    साजरा करूया हा गुढीपाडवा

    नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    7- सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा.. मराठी नववर्षाच्या अनंत शुभेच्छा!

    8- नववर्षाची सकाळ होताच तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.. मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

    9- नववर्ष घेऊन गुढीपाडवा आला

    सुखसमृद्धीचा आनंदाचा क्षण आला

    नवी आशा, नवा प्रवास, नवा ध्यास

    घेऊन आला आजचा दिवस खास

    गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

    10- सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

    सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस

    सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

    सोन्यासारख्या लोकांना गुढीपाडवा

    आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!