Ambedkar Jayanti 2026 Wishes In Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात देश-विदेशात साजरी केली जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता, न्याय आणि बंधुभाव व शिक्षणासाठी खर्ची घातले.
बाबासाहेबांनी केवळ शोषितांच्या आणि दलितांच्या हक्कांसाठी लढा दिला नाही, तर महिला शिक्षण, कामगार कल्याण आणि आर्थिक सुधारणा व कृषी क्षेत्रातही ऐतिहासिक कार्य केले. "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा त्यांनी दिलेला महामंत्र आजही कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 Wishes In Marathi) आपल्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश.WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन! जय भीम

ज्यांच्यामुळे आज आपण ताठ मानेने जगत आहोत,
त्या जगातील सर्वात विद्वान व्यक्तीला,
महामानवाला कोटी कोटी प्रणाम
भीम जयंतीच्या शुभेच्छा!

आजचा दिवस आनंदाचा,
आजचा दिवस उत्साहाचा,
कारण आज जन्म झाला
माझ्या भीमरायाचा
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

"शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा"
हा महामंत्र देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

ज्यांनी आपल्याला स्वाभिमानाने
जगायला शिकवले, त्या क्रांतीसूर्याला मानाचा मुजरा!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भीमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाहीत…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम!

राजा होता संविधानाचा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अढळ धैर्य, जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान, स्वाभिमानाने जगायला दिला आत्मसन्मान…! आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

शून्यातून विश्व निर्माण करणारी शक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अशा युगपुरुषाच्या विचारांना आज पुन्हा एकदा स्मरण्याचा दिवस
जय भीम!

गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या,
म्हणजे तो बंड करून उठेल
या विद्रोही विचारांच्या जनकाला जयंती निमित्त अभिवादन

ज्ञानाच्या अथांग सागरास
आणि जगातील सर्वात महान संविधान देणाऱ्या
महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जय भीम, जय भारत!
