मुंबई. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर आता विविध स्तरांतून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनेही आपलं मत मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टपणे समर्थन केलं आहे.

एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना प्राजक्ता माळी म्हणाली की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अशोक खरात प्रकरण अतिशय योग्य पद्धतीने हाताळलं आहे. त्यांच्या वाणीतून कधीही चुकीचा शब्द बाहेर पडलेला नाही. त्यांनी नेहमीच जबाबदारीने आणि संयमाने भूमिका मांडली आहे.

नेतृत्वात संयम महत्त्वाचा-

प्राजक्ता माळी यांनी पुढे सांगितले की, कोणत्याही संवेदनशील प्रकरणात राज्याच्या प्रमुखाने संयम राखणं अत्यंत गरजेचं असतं आणि ते फडणवीसांनी पाळलं आहे. अशा प्रकरणांमध्ये भावना उफाळून येतात, पण नेतृत्वाने संतुलन राखणं महत्त्वाचं असतं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली, आहे असे ही माळी हिने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

    नाशिकच्या सिन्नर परिसरात उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात याच्यावर फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरू असून काही आरोपींवर कारवाईही करण्यात आली आहे.

    विविध प्रतिक्रिया सुरूच!

    या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशा परिस्थितीत प्राजक्ता माळी यांचं मुख्यमंत्र्यांवरील समर्थन लक्षवेधी ठरत आहे.

    दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.