जेएनएन, पुणे. Maharashtra Board Result 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. 2025-26 च्या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत झाली. आता या परीक्षांच्या निकालाकडे सर्वांची नजर लागली आहे. mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर दहावी निकाल पाहता येईल.
15 लाख विद्यार्थांनी दिली परीक्षा
पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली आहे. यंदा नोदणी केलेल्या 15,32,487 विद्यार्थ्यांमध्ये 8,20,229 मुले, 7,12,240 मुली, तर 18 तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
कसा पाहायचा निकाल?
- निकाल जाहीर झाल्यावर तो mahresult.nic.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या अधिकृत वेबसाइट्सवर सहज पाहता येईल.
- विद्यार्थ्यांना फक्त आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल.
- त्यानंतर त्यांना त्यांचा निकाल वेबसाईटवर दिसेल.
- विद्यार्थांनी त्याची एक प्रत काढून घ्यावी किंवा निकाल सेव्ह करून ठेवावा.
- बोर्डाच्या mahahsscboard.in या साइटवरही माहिती मिळू शकणार आहे.
मागील तीन वर्षांचा अनुभव काय सांगतो?
- गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये बारावीचा निकाल 5 मे रोजी लागला होता.
- 2024 मध्ये बारावी 21 मे रोजी लागला होता.
- 2023 मध्ये बारावी 25 मे रोजी लागला होता.
या आकडेवारीवरून स्पष्ट दिसते की बारावी निकाल मे महिन्यातच येण्याची शक्यता आहे.
2026 च्या बारावीच्या निकालाची अंदाजित वेळ (When Will Class 12 Results Be Declared)
12 वी (When Will HSC result Declared) : मे 2026 चा पहिला किंवा दुसरा आठवडा
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी संख्या
- मुंबई – 352718
- पुणे – 2,60,014
- नागपूर – 1,60,530
- छत्रपती संभाजीनगर – 191493
- कोल्हापूर – 116611
- अमरावती – 156915
- नाशिक – 173651
- लातूर – 96542
- कोकण – 24013
शाखानिहाय विद्यार्थी
- विज्ञान – 7 लाख 99 हजार 773
- कला – 3 लाख 80 हजार 692
- वाणिज्य – 3 लाख 20 हजार 152
- व्यावसायिक अभ्यासक्रम – 27 हजार 378
- आयटीआय – 4 हजार 492
हेही वाचा - Maharashtra Board SSC HSC Result 2026: कधी लागणार दहावी, बारावीचा निकाल? तारखांसंदर्भात मोठी अपडेट समोर!
