नवी दिल्ली - Lionel Messi Retirement: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत मेस्सीने फुटबॉलचा निरोप घेतला. फिफा विश्वचषक (FIFA World Cup) फायनल सामना मेस्सीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. अर्जेंटिना संघ सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्यापासून हुकला होता. स्पेनने 1-0 ने सामना जिंकून दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला होता.

मेस्सीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून निवृत्तीची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करताना त्याने हेदेखील स्पष्ट केले की तो विविध लीगमध्ये खेळणे सुरूच ठेवेल.

निवृत्तीची घोषणा करताना मेस्सी भावुक -

मेस्सीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी तो अत्यंत भावुक दिसला. त्यांने लिहिले, "फायनलच्या सामन्यानंतर बराच काळ निघून गेला आहे. खूप विचार केल्यानंतर मला सर्वांना सांगायचे आहे की मी नॅशनल टीममधून (राष्ट्रीय संघातून) निवृत्त होत आहे. हा असा निर्णय होता, ज्याने मला खूप दुःख झाले आणि होतही आहे. मला वाटते की हीच योग्य वेळ आहे. मी नेहमीच माझे सर्वस्व दिले आहे, केवळ गेल्या काही वर्षांतच नाही जेव्हा आपण सर्वकाही जिंकलो, तर त्याआधीही. मी नेहमीच या जर्सीसाठी लढलो आणि तुम्हाला आनंद मिळावा तसेच फुटबॉलच्या माध्यमातून अर्जेंटिनाचा असण्याचा अभिमान वाटावा यासाठी सर्व काही पणाला लावले.

त्याने पुढे लिहिले, "आता जास्त वेळ उरलेला नाही आणि सगळे चॅप्टर (टप्पे) बंद होत आहेत. हा असा एक टप्पा आहे, ज्याचा मला खूप त्रास झाला आहे. मला राष्ट्रीय संघात राहायला आवडते, आवडायचे आणि नेहमीच आवडत राहील. मी माझे सर्वस्व दिले आणि आता माझ्याकडे देण्यासारखे काहीही उरलेले नाही. माझ्यामागे काही उत्कृष्ट तरुण खेळाडू येत आहेत आणि ते तिथे पोहोचण्यास पात्र आहेत. या 20 वर्षांतील तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. आता मैदानाच्या आतून तुमचा आवाज ऐकणे मी मिस करेन. आता मी तुमच्यापैकीच एक बनेन, जो बाहेरून संघाला चीअर आणि सपोर्ट करेल.

मेस्सीने कुटुंबाचे मानले आभार-

    मेस्सीने या प्रसंगी आपल्या कुटुंबाचीही आठवण काढली. त्याने लिहिले, "या सुंदर पण कठीण प्रवासात माझ्या कुटुंबाने नेहमीच माझी साथ दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. प्रत्येक प्रशिक्षक (कोच), सहकारी खेळाडू (टीममेट) आणि व्यवस्थापकांचे आभार, ज्यांच्यासोबत मला माझा अनुभव शेअर करण्याची संधी मिळाली. मी माझ्यासोबत कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी आणि क्षण घेऊन जात आहे. मी शांततेने आणि अभिमानाने निरोप घेत आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत असे क्षण शेअर केले, ज्यांचा मी कधी विचारही केला नव्हता. हे सर्व तुमच्यासोबत शेअर करून खूप छान वाटले. देवा, मला अर्जेंटिनाचा बनवल्याबद्दल धन्यवाद."