नवी दिल्ली. Womens asia cup 2026 Schedule: महिला आशिया चषकाचा रणसंग्राम आजपासून सुरू होत आहे. आशियातील आठ देशांचे संघ विजेतेपदासाठी दुबईत एकमेकांशी झुंजणार आहेत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट टीम विजेतेपदासाठी प्रबल दावेदार मानली जात आहे. मात्र अन्य संघांना कमी लेखून चालणार नाही.
आठ संघ दोन ग्रुपमध्ये विभाजित केले आहेत. भारतसह पाकिस्तान, थायलँड, हाँगकाँग आदि संघांना ग्रुप-ए मध्ये ठेवले आहे तर तर ग्रुप-बी मध्ये यूएई, श्रीलंका, बांग्लादेश आणि इंडोनेशिया आदि संघ आहेत. प्रत्येक ग्रुपमधील अव्वल दोन संघ पुढच्या फेरीत पोहोचतील. फायनल 13 सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
भारत आणि पाकिस्तान कधी भिडणार?
टूर्नामेंटमधील सलामीचा सामना आज थायलंड आणि हाँगकाँग यांच्यात खेळला जाईल. त्याचबरोबर भारतीय टीम आपला पहिला सामना 30 ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध खेळेले. ज्या मुकाबल्याची सर्वाधिक प्रतीक्षा आहे तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गट साखळीतील सामना पाच सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता खेळला जाईल. त्याआधी तीन सप्टेंबर रोजी भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे.
कोठे पाहू शकता लाइव्ह मॅच-
आशिया चषकातील सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहिले जाऊ शकतात. त्याचबरोबर सोनी लिव अॅपवरही सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहिले जाऊ शकते. सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून सुरू होतील.
स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक -
- 28 ऑगस्ट: थायलंड विरुद्ध हांगकांग, चीन - रात्री 8:00 वाजता
- 29 ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध संयुक्त अरब अमिरात- रात्री 8:00 वाजता
- 30 ऑगस्ट: भारत विरुद्ध थायलंड - रात्री 8:00 वाजता
- 31 ऑगस्ट: बांग्लादेश विरुद्ध इंडोनेशिया- रात्री 8:00 वाजता
- 1 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध थायलंड- रात्री 8:00 वाजता
- 2 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध इंडोनेशिया- रात्री 8:00 वाजता
- 3 सप्टेंबर: भारत विरुद्ध हांगकांग, चीन- रात्री 8:00 वाजता
- 4 सप्टेंबर: संयुक्त अरब अमीरात विरुद्ध इंडोनेशिया- रात्री 8:00 वाजता
- 5 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान - रात्री 8:00 वाजता
- 6 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश - रात्री 8:00 वाजता
- 7 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध हांगकांग चीन- रात्री 8:00 वाजता
- 8 सप्टेंबर: बांग्लादेश विरुद्ध संयुक्त अरब अमीरात- रात्री 8:00 वाजता
- 10 सप्टेंबर: सेमी-फायनल 1- रात्री 8:00 वाजता
- 11 सप्टेंबर: सेमी-फायनल 2- रात्री 8:00 वाजता
- 13 सप्टेंबर: फायनल- रात्री 8:00 वाजता
