मुंबई. Krishna Janmashtami 2026 Wishes In Marathi: वैदिक पंचांगानुसार आज म्हणजेच 04 सप्टेंबर रोजी  देशभरात कृष्णजन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा-अर्चा करण्याचा खूप महत्व असते. त्याचबरोबर विधिवत पद्धतीने व्रतही केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार बाल कृष्णाची पूजा केल्याने जीवनात  शुभ फळे प्राप्त होतात.

यानिमित्त लोक आपल्या प्रियजनांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा (Janmashtami Wishes in Marathi) देतात. आम्ही या लेखात जन्माष्टमीचे शुभ संदेश दिल आहेत याच्या माध्यमातून तुम्हा आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

आजच्या डिजिटल युगात कोणत्याही सणाच्या व उत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp, Instagram, Facebook आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही WhatsApp Status किंवा Instagram Story वर ठेवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा, संदेश आणि स्टेटस शोधत असाल, तर हे संदेश नक्की उपयोगी ठरतील.

जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 2026 (Janmashtami 2026 Wishes in Marathi)

1- “गोविंदाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर होवो आणि आनंदाची नवी पहाट उजाडो. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा!”

2- अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं,

    राम नारायणं जानकी वल्लभं,

    जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

    3- राधाची भक्ती, बासुरीची गोडी

    लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास

    सर्व मिळून साजरा करू

    गोकुळाष्टमीचा दिवस खास...

    गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

    4- “जय श्रीकृष्ण!

    कान्हाच्या आशीर्वादाने

    तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो.”

    5- “मुरलीच्या सुरात प्रेम आहे,

    कृष्णाच्या नावात समाधान आहे,

    गोविंदाच्या कृपेने आयुष्य सुंदर होवो…

    श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!”

    6- नंदाच्या घरी आनंद झाला, जय देवकीनंदन! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

    7- गोकुळामध्ये होता ज्याचा वास,

    गोपिकांसोबत ज्याने रचला रास,

    यशोदा, देवकी ज्याची मैय्या,

    तोच साऱ्यांचा लाडका

    श्री कृष्ण कन्हैया!

    8 - लोणी चोरून ज्याने खाल्ले,

    बासरी वाजवून ज्याने नाचवले

    साजरा करा आनंद त्याच्या जन्मदिवसाचा,

    ज्याने जगाला प्रेम शिकवले!

    9 -नंद के आनंद भयो, जय कन्हैया लाल की,

    हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की।

    कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।

    10 -प्रेमाने कृष्णाचे नाव जपा,

    मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण.

    कृपा बरसेल कान्हाची अशी,

    आयुष्यात काही कमतरता राहणार नाही.

    11- राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद लोण्याचा स्वाद,

    गोपींसोबतची रास

    असा आहे श्रीकृष्ण खास

    श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा