त्रिशूर. राष्ट्रीय महामार्ग-66 वर शुक्रवारी रात्री एक भरधाव कार रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर आदळून झालेल्या एका भीषण अपघातात ८ लोकांचा मृत्यू झाला. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा पार चक्काचूर झाला व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात शुक्रवारी रात्री 11.40 वाजण्याच्या सुमारास झाली.

ही अपघात कॅपमंगलमजवळ पनमपिक्कुन्नू येथे झाला. मदुराईची नोंदणीकृत कार गुरुवायूरकडून कोडुंगल्लूरकडे जात होती. रस्त्याचे काम सुरू असल्याने त्याच दिशेने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर कार पाठीमागून जोरदार आदळली.

सर्व मृत कारमधील प्रवासी होते. ते तामिळनाडूचे विद्यार्थी असल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळावर डिंडीगुलच्या पीएसएनए इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचे ओळखपत्र आढळून आले आहे.

स्थानिक लोक, अग्निशमन दर व बचाव पथकांसह पोलिसांनी तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. कारचा पार चक्काचूर झाला आहे. दोन जखमींंना बाहेर काढण्यासाठी कारचा पत्रा कापावा लागला.

स्थानिक लोकांसह अग्निशमन कर्मचारी व पोलिसांनी बचाव कार्य राबवून जखमी व मृत तरुणांना कारमधून बाहेर काढले. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह त्रिशूर मेडिकल कॉलेजच्या शवागारात नेण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन तामिलनाडूचे होते.