जेएनएन, नाशिक. Earthquake in Maharashtra: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. एकाच रात्री दोनदा नाशिक भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. जिल्ह्यातील कळवण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात हे धक्के जाणवले.

मध्यरात्री नाशिकमध्ये भूकंप (Earthquake in Nashik )

रात्री 12 वाजून 05 मिनिटांनी आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ आणि अंबापूर परिसरातील नागरिकांना काही सेकंद भूकंपाचे हादरे जाणवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या भूकंपाची तिव्रता ही 3.5 नोंदवण्यात आली आहे.

नाशकात पहाटे एक भूकंपाचा धक्का

तसंच, सकाळी पहाटे 5 वाजून 34 मिनीटांनी 3.4 तिव्रतेचा पुन्हा एकदा सौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे नागरिकांत घबराट पसली होती. या दरम्यान घरातील वस्तू तसेच काही ठिकाणी दरवाजे-खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, 8 ऑगस्ट रोजी याच परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला होता. सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली नाही.