मुंबई. Mumbai Airport: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T-1 टर्मिनलच्या दुरुस्ती व सुधारणा कामे करण्यात येणार आहेत. माहितीनुसार ही कामे 1 ऑक्टोबर नंतर सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी सविस्तर माहिती घ्यावी.

विमानांच्या संचालनाचे नियोजन बदलण्याची शक्यता

मुंबई विमानतळ हे देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. दररोज मोठ्या संख्येने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी ये-जा करतात. अशा परिस्थितीत T-1 टर्मिनलवरील दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने विमानांच्या संचालनाचे नियोजन बदलण्याची शक्यता आहे.

विमान वाहतूक नवी मुंबईला हलवण्यात येणार का?

नाही. अद्याप मुंबई विमानतळाकडून तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही आहे. मात्र, T-1 टर्मिनलवरील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. हा बदल CSMIA च्या आठ दशके जुन्या 'टर्मिनल 1' च्या नियोजित पुनर्विकासाशी संबंधित आहे; या प्रकल्पांतर्गत पाडकामाचा पहिला टप्पा जानेवारी 2027 मध्ये सुरू होणार आहे. या हालचालीचा उद्देश अतिरिक्त कार्यान्वित क्षमता निर्माण करणे आणि बांधकाम सुरू असताना मुंबईच्या विमान वाहतूक नेटवर्कचे कामकाज सुरळीतपणे चालू ठेवणे हा आहे.