एजन्सी, छत्रपती संभाजीनगर. Marathwada rainfall Report: कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, सरासरीपेक्षा 20.3 टक्क्यांनी कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील लागवडीखालील क्षेत्र यावर्षी जवळपास 3.5 लाख हेक्टरने घटले आहे. (Marathwada Sowing Report)
पेरणी क्षेत्र 46.19 लाख हेक्टर असून ते 49.72 लाख हेक्टरच्या पंचवार्षिक सरासरीपेक्षा सात टक्क्यांनी कमी आणि गेल्या वर्षीपेक्षा 2 लाख हेक्टरने कमी आहे, असे त्यात म्हटले आहे.
मराठवाड्यात पावसाची घट
छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मराठवाड्यात 479.1 मिमी पाऊस झाला असून, अपेक्षित 586.1 मिमीच्या तुलनेत 20.3 टक्के कमी आहे. दुसऱ्या अधिकृत अहवालानुसार, परभणी (34.7 टक्के) आणि लातूर (40.6 टक्के) मध्ये तूट अधिक तीव्र आहे.
उसाची लागवडही घटली
ही घट नगदी पिकांमध्ये सर्वाधिक दिसून येते. या हंगामात कापसाखालील क्षेत्र 2.65 लाख हेक्टरने कमी होऊन 12.14 लाख हेक्टरवर आले आहे, तर उसाची लागवड सरासरी 3.24 लाख हेक्टरवरून घटून केवळ 43,821 हेक्टरवर आली आहे, असे कृषी विभागाने सांगितले.
शेतकऱ्यांनी आता सोयाबीन, मका आणि सूर्यफूल या पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र 12 टक्क्यांनी वाढून 25.74 लाख हेक्टरवर पोहोचले आहे, तर मक्याखालील क्षेत्र पाच टक्क्यांनी वाढले आहे. 2.68 लाख हेक्टरवर सूर्यफूल लागवड असून, त्यात 39 टक्क्यांनी वाढ होऊन ती 2,289 हेक्टरवर पोहोचली आहे, असे त्यात नमूद केले आहे.
