जेएनएन, नवी दिल्ली. Happy Friendship Day 2026 Marathi Wishes: आपल्या प्रिय मित्रांसाठी दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी जागतिक फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा 2 ऑगस्टला म्हणजेच आज आहे. 

फ्रेंडशिप डे शुभेच्छा संदेश (Happy Friendship Day Wishes)

  1. रक्ताची नसूनही रक्तात भिनते ती मैत्री, मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
  2.  मन मोकळेपणाने आपण ज्याच्याकडे बोलू शकतो, रागावू शकतो,
    आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री….
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Friendship Day 2026 Wishes)
  3.  लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो…
    लोक स्वप्न पाहतात, आम्ही वास्तव पाहतो…
    लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो
  4. उधार मागणाऱ्या आणि उदार होऊन मदत करणाऱ्या
    सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप डे.
    तुम्ही आपले खास आहात!
  5. मला ‘मी’ म्हणून स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला
    हॅप्पी फ्रेंडशिप डे!
  6. भले माझ्या मित्रांना रोज कितीही टोमणे मारा पण…
    नशीब लागतं राव…
    माझ्यासारखा बेस्ट फ्रेंड मिळायला..
    हॅप्पी फ्रेंडशिप डे, दोस्ता!
  7. दुःख अडवायला उंबरासारखा
    मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा
    मैत्री दिनाच्या शुभेच्छा!
  8. मैत्रीचा शोध घेतला जात नाही,
    प्रत्येकासोबत मैत्रीचे नाते जोडले जात नाही,
    आणि खास मित्रांचं आयुष्यातलं स्थान
    कोणी हिरावून घेऊ शकत नाही
    हॅपी फ्रेंडशिप डे !!! 
  9. तुझी माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा
    मुखवट्याच्या या जगामध्ये खात्रीचा विसावा
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 
  10.  मैत्रीचं नातं लाखमोलाचं असते
    प्रेमामध्ये मैत्रीचं नातं दुरावते
    पण मैत्रीतील प्रेम कायम वाढतच जातं
    हॅपी फ्रेंडशिप डे !!!
  11. मित्र नेहमी स्तुती करणारे नसावेत
    प्रसंगी आरशाप्रमाणे गुणदोष दाखवणारेही असावेत
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Happy Friendship Day 2026 quotes

सखे, तू माझ्यासोबत असल्याने,
जीवनाच्या प्रत्येक क्षणाला साजेशी आहे.
तुझ्या हसण्यात, तुझ्या बोलण्यात,
माझ्या जीवनाची माया लपलेली आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

-------------------- 

विश्वासाची पायरी चढूनच मैत्रीचे दरवाजे उघडतात,
जिथे शब्दांपेक्षा नजरेची भाषा बोलते,
एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊन,
सुखाच्या क्षणांना दुप्पट करते.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    —-------------------

    मैत्रीत विश्वास असेल तर,
    कोणतीही अडचण लहान वाटते.
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

    —--------------

    विश्वास हा मैत्रीचा कणा आहे,
    त्यावर सर्व काही टिकून आहे.
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा