नवी दिल्ली: 1 सप्टेंबरपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी अनेक मोठ्या शहरांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 9.50 रुपयांची वाढ केली आहे.
किमतींमधील हा बदल महिन्याच्या सुरुवातीलाच झाला असून, त्यामुळे व्यावसायिक एलपीजीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांचा खर्च वाढला आहे. ताज्या दरपत्रकानुसार, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,738 रुपयांवरून वाढून 2,747.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये ही किंमत 2,906 रुपयांवरून वाढून 2,916.50 रुपये झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर-
या दरवाढीचा फटका प्रामुख्याने रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबे, मिठाईची दुकाने आणि स्वयंपाकासाठी तसेच इतर कामांसाठी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांना बसणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी मात्र काहीसा दिलासा आहे, कारण या मासिक बदलामध्ये 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
व्यावसायिक एलपीजीचे कोणत्या शहरात किती दर वाढले?
| शहर | नवीन दर | जुना दर | फरक |
| दिल्ली | ₹ 2,738 | ₹2,738.00 | ₹9.50 |
| कोलकाता | ₹2,884.00 | ₹2,872.50 | ₹11.50 |
| मुंबई | ₹2,701.00 | ₹2,691.50 | ₹9.50 |
| चेन्नई | ₹2,916.50 | ₹2,906.00 | ₹10.50 |
